नैसर्गिक शुद्ध मध , Natural Pure Honey
निसर्गाने मानवास दिलेल्या सर्वोत्तम गोष्टी मध्ये मधाचा समावेश हा करावाच लागेल, नैसर्गिक मधात anti-allergic, anti-inflamatory, आणि anti- oxidant तत्व निसर्गतः आढळतात मानवी शरीरातील रोगांचे मुख्य कारण एलर्जी शरीरांतर्गत उष्णता आणि ऑक्सिडेशन हे आहे त्यामुळे मध आपल्याला एक कवच रुपी सहाय्यक आहे. याच बरोबर क्रॉनिकल डिसीजेस पासुन बचाव करणारे घटक मधामध्ये आढळतात. मधात खुप सारे मानवी शरीरास उपयुक्त एन्झाइम्स आहेत जे शरीर स्वास्थ्यासाठी सर्वोत्कृष्ट सिद्ध झाली आहेत.
आमचा उद्देश नैसर्गिक शुद्ध मध देणे हा असल्याने आम्ही मधमाशी पालण क्षेत्रात सुरवात केली आणि आज आमच्या वसाहत मधपेट्या अशा विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत जिथे नैसर्गिक फुलोरा आहे मधपेट्या सातत्याने हलवाव्या लागतात कारण वेगवेगळ्या त्रुतुनुसार वेगवेगळ्या वनस्पती फुलधारणा करतात वनस्पतींना फुलोरा असेल तरच मधमाश्यांना अन्न भेटते त्यातुनच मधसंकलन होते मध संकलन हे मधपेट्यामध्ये होते आणि शास्त्रीय पद्धतीने कुठल्याही जीवाची हानी न होता मधसंकलन आम्ही करत असतो. आमच्या कढील मधुनिष्काषन यंत्रात गुरु्त्वाकर्षण पद्धतीने यंत्र फिरवल्याने तळाला मध जमा होतो त्यामुळे एकही मधमाशी मरत नाही, किंवा अळी अंडी अवस्थेतील मधमाशी म्रुत्यु पावत नाही आणि सर्वोत्तम हायजेनिक शुद्ध मध आपणास आमच्या मार्फत मिळत़ो त्रुतुनुसार आमच्या कडुन आपणास विविध प्रकार चा मध मिळेल
मधमाशी ज्या फुलांपासून मध जमा करते त्या मधास त्या वनस्पती च्या नावाने ओळखले जाते उदाहरणार्थ नीमच्या फुलांपासून मधमाशी ने जमा केलेला मध नीम मध नावाने ओळखला जातो, बाभूळच्या फुलांपासून मधमाशी ने जमा केलेला मध बाभुळ मध नावाने ओळखला जातो, जांभळाच्या फुलांपासून मधमाशी ने जमा केलेला मध जांभुळ मध नावाने ओळखला जातो , फॉरेस्ट मध्ये मधपेट्या ठेवल्यानंतर फॉरेस्ट जंगली मध मिळतो, निसर्ग बहरलेला असतो तेव्हा खुप सार्या वनस्पती फुलोऱ्यात असतात तेव्हा मल्टिफ्लोरल मध प्राप्त होतो. आमच्या कडे त्रुतुनुसार उपलब्धतेनुसार खालील प्रकारचा मध मिळेल
ओवा मध (अजवाईन शहद)
तुळस मध (तुलसी शहद)
सुर्यफुल मध (सुरजमुखी शहद)
मोहरी मध (सरसो शहद)
बाभुळ मध (बबुल किकर शहद)
जांभुळ मध (जामुन शहद)
निलगीरी मध (निलगीरी शहद),
शेवगामध,
जंगली मध (फॉरेस्ट शहद),
मल्टीफ्लोरल मध
उपलब्धतेनुसार मिळेल
(All Maharashtra Courier Service)
संपर्क
Raw and real honey
Saipushp, plot no 35, survey no 6, Shanti Nagar, Makhmalabad Road , Makhmalabad, Nashik 422003
Contact no. 9325066675, 976643996
Comments
Post a Comment